सार: कोरोनाविषाणू हा विषाणूंचा एक मोठा गट आहे. त्यांच्यामुळे साध्या सर्दी-पडशापासून ते मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम (MERS) आणि सिव्हिअर अॅक्युट रेस्पिरेटरी सिंड्रोम (SARS) अशा अधिक गंभीर स्वरूपाचे अनेक आजार होऊ शकतात.
२०१९ साली चीनमधील वुहान प्रांतामध्ये एक नवीन प्रकारचा कोरोना विषाणू (कोविड-१९) सापडला गेला. हा नवीन प्रकारचा विषाणू याआधी कधीही माणसांमध्ये आढळला नव्हता.
हा कोर्स कोविड-१९ आणि श्वसन संबंधात उद्भवणाऱ्या इतर विषाणूंविषयी सर्वसाधारण माहिती पुरवतो आणि याचा हेतू सार्वजनिक आरोग्य संबंधित व्यावसायिक, घटना व्यवस्थापक आणि संयुक्त राष्ट्रे, आंतरराष्ट्रीय संघटना आणि एनजीओ संघटना यांच्यासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना माहिती देणे असा आहे.
या आजाराचे अधिकृत नाव काही संशोधन केल्यानंतर ठरवले गेले असल्याने कुठेही nCoV असा उल्लेख आढळल्यास त्याचा अर्थ कोविड-१९, म्हणजे अलीकडेच शोध लागलेल्या कोरोनाविषाणूंमुळे होणारा संसर्गजन्य आजार असे समजावे.
कृपया लक्षात घ्या की या कोर्सची सामग्री सध्या सर्वात अलीकडील मार्गदर्शन प्रतिबिंबित करण्यासाठी सुधारित केली जात आहे. खालील कोर्सेसमध्ये तुम्हाला विशिष्ट COVID-19-संबंधित विषयांवर अपडेट केलेली माहिती मिळू शकते:
लसीकरण: COVID-19 लस चॅनल
IPC उपाय: IPC साठी COVID-19
प्रतिजन जलद निदान चाचणी: 1) SARS-CoV-2 प्रतिजन जलद निदान चाचणी; 2) SARS-CoV-2 प्रतिजन आरडीटी अंमलबजावणीसाठी मुख्य विचार